सोन्याच्या दरात घसरण, सोने खरेदी धारकांना सुवर्ण संधी..!

मुंबई, 30 एप्रिल : सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कमकुवत जागतिक निर्देशांमुळे सोन्याच्या किंमती सलग सातव्या दिवशी खाली आल्या आहेत. शुक्रवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती 0.12 टक्क्यांनी घसरत आहेत. तथापि, आज चांदीच्या वायदा भावात वाढ होताना दिसत आहे. मे वायदा चांदीच्या दरात 0.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव (Gold Price on MCX) : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी जून वायदा सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 46,669 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.75 टक्क्यांनी घसरले होते. ऑगस्ट 2020 मधील विक्रमी दर 56,200 प्रति 10 ग्रॅम रुपयांपेक्षाही 10,000 रुपये कमीच आहे.चांदीचा भाव (Silver Price on MCX) : एमसीएक्सवरील मे वायदा चांदीचा दर 70 रुपयांनी वाढून 67,544  रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत आहे. डॉलरच्या दरात घसरणीमुळे,आज सोन्याच्या दरात वाढ..!

मागील सत्रात चांदीच्या दरांत -0.6 टक्क्यांनी घसरले होते.2020 मध्ये यूएस ट्रेझरी बाँड यील्ड्समध्ये वाढ झाल्यामुळे, सोन्याने चमक काहीशी कमी झाली होती. यावर्षीही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम  तर, चांदी 80,000 रुपये प्रति किलो अर्थात सर्वात उच्चांकावर होती.यूएस ट्रेझरी बाँडमुळे सोन्यावर दबावगुरुवारी (29 एप्रिल) अमेरिकन ट्रेझरी बाँड यील्ड्सने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव आणत दोन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांक गाठला आहे.

स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 0.2 टक्क्यांनी घसरून 1,767.12 वर घसरले आहेत (Gold silver Price Today on 30 April 2021 MCX Rates).स्पॉट बाजारभावडॉलरच्या घसरणीमुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती 61 आणि चांदी 1,776 रुपयांनी वधारल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारामध्ये 61 रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर 46472 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदीचा भाव 1776 रुपयांनी वाढून 68785 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला आहे.या महिन्यात 4 हजारांनी महागले सोनेया महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे.

जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता. News18.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *