कोरोनाचे 3.16 लाख नवे रूग्ण, भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे..!

नवीदिल्ली, 22 एप्रिल : देशभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट झपाट्यानं पसरत आहे. दररोज कोरोना विषाणू नवीन रेकॉर्ड बनवत असल्याचं पहायला मिळत आहे. बुधवारी 24 तासात 3 लाख 15 हजार 478 नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून आतपर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातील नाही तर जगभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. Remdesivir साठीचे आयात शुल्क रद्द व किंमतीतही होणार घट..!

या अगोदर जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्डड अमेरिका या देशाच्या नावावर होता. अमेरिकेत 8 जानेवारी 2021 रोजी 3,07,570 कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता याबाबतीत भारत सर्वात पुढे आहे. Esakal.com

मागील 24 तासात भारतामध्ये 2101 जणांनी जीव गमावला आहे. बुधवारी 1 लाख 79 हजार 372 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. masterreporter.com

कोरोना विषाणूमुळे आतपर्यंत 1लाख 84 हजार 672 जणांचा मृत्यू झाला आहे. भारत देशामध्ये कोरोनाबाधीतांची संख्या एकूण 1 कोटी 59लाख 24 हजार732 इतकी झाली आहे. देशात सध्या 22 लाख 84 हजार209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.एकूण कोरोनाबाधीतांच्या संख्यापैकी 14.3टक्के आहेत. अभिनेत्री हिना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *