ऑक्सिजन अभावी दिल्लीमध्ये मृत्यु तांडव..!

नवी दिल्ली, 24 एप्रिल: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (lack of oxygen) दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात शुक्रवारी 25 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona patients death) झाल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा दिल्लीतील आणखी एका रुग्णालयातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

दिल्लीच्या रोहिणी परिसरात असणाऱ्या जयपूर गोल्डन रुग्णालयात (Jaipur golden hospital) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 जणांचा मृत्यू (20 patients death in delhi) झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ऑक्सिजन न मिळाल्यानं 20 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आहे.संबंधित रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालय प्रशासनाने म्हटलं की, रुग्णांना 3600 लीटर ऑक्सिजनची गरज होती. पण रात्री बारा वाजेपर्यंत केवळ 1500 लीटर ऑक्सिजनची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे संबंधित 20 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. जयपूर गोल्डन रुग्णालयातील मेडिकल सुप्रिंटेंडेंट यांनी न्युज 18 ला माहिती देताना सांगितलं की, या रुग्णालयात अद्याप 200 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी देखील अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालं नाही. त्यामुळे अन्य 200 रुग्णांचा जीवही टांगणीला लागला आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीती पसरली आहे.डीसीपींना घटनेची माहितीच नाही.
दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझरची पार्टी, 5 जणांचा मृत्यू..!

दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात मृत्यू तांडव घडला असताना, दुसरीकडे रोहिणी जिल्ह्यातील डीसीपींना मात्र या घटनेची खबरचं नव्हती. त्यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती संबंधित रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही. तसेच मृतांच्या आकडेवारीबाबतही रुग्णालयाने अधिकृत पुष्टी केली नाही.विशेष म्हणजे काल (शुक्रवारी) दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनच्या अभावामुळे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिवाय दिल्लीतील इतरही अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनची कमी असल्याची माहिती समोर येत आहे.News18.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *